महसूल, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:51+5:302021-02-06T04:45:51+5:30

कोल्हापूर : कोविशिल्ड लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता महसूल, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात ...

Revenue, police officers start vaccinating employees | महसूल, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू

महसूल, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू

Next

कोल्हापूर : कोविशिल्ड लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता महसूल, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आणखी पाच केंद्रे वाढविली आहेत.

जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला ११ नंतर २० आणि सध्या २१ आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण सुरू आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश होता. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत येथील अधिकारी आणि कर्र्मचारी आणि गृहखात्याअंतर्गत येणाऱ्या सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यांची आवश्यक ॲपवर आधीच नोंदणी करण्यात आली आहे.

३ फेब्रुवारीपर्यंत १७२०० जणांना लस टोचण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६५ टक्के म्हणजे ११११६ इतके पूर्ण झाले आहे. आधीच्या २० केंदरांमध्ये आता गांधीनगर ग्रामीण रुग्णालय, हुपरी, कोतोली, मुरगूड प्राथमिक केंद्र आणि महापालिका क्षेत्रातील एक केंद्र वाढविण्यात आले आहे.

चौकट

स्पॉट अपग्रेडेशन

आता लसीकरणासाठी गेल्यानंतर तेथे अपग्रेडेशनची सोय असल्याने लसीकरण प्रक्रिया आणखी सुटसुटीत झाली आहे. याआधी ज्यांची ॲपवर नोंद करण्यात आली आहे अशांनाच मेसेज जात होते आणि त्यांनाच लस घेण्याची परवानगी होती. परंतु, नंतर यामध्ये बदल करण्यात आला. ज्यांनी नोंद केली आहे अशांनी लसीकरणाच्या वेळेत कधीही गेले आणि त्यांना मेसेज जरी आला नसेल तरी केंद्रावर गेल्यानंतर ते ओळख पटवून लस घेऊ शकतात. यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

चौकट -

लसीकरण कमी झाल्याने सीपीआरला पत्र

कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या सीपीआरमध्ये लसीकरणाचे प्रमाण केवळ १९ टक्के असल्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना याबाबत देसाई यांनी पत्र लिहिले आहे. सीपीआरचे लसीकरण प्रमाण खूपच कमी असल्याने त्याचा जिल्ह्याच्या उद्दिष्टावर परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Revenue, police officers start vaccinating employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.