महसुली कायद्यात बदल करणार : खडसे
By admin | Published: June 20, 2015 12:49 AM2015-06-20T00:49:12+5:302015-06-20T00:51:46+5:30
सात-बारा न पाहता शेतकऱ्यांना एक लाख कर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन
कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या महसुली कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुुक्रवारी येथे बोलताना दिली. राज्यात शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने ताब्यात घेतलेल्या शेतजमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन तसेच ‘इ डिस्निक’ आज्ञावलीचा शुभारंभ समारंभात महसूलमंत्री खडसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
महसूल विभागाशी संबंधित कुळ, ‘ब सत्ता’, इनामी व लीज कायद्यातील काही चुकीच्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास )
सात-बारा न पाहता शेतकऱ्यांना एक लाख कर्ज
कोल्हापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर अनेक नोंदी असल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. यासाठी सात-बारा न पाहता एक लाखापर्यंत व्यक्तिगत कर्ज देणार असल्याची घोषणा महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. / वृत्त २ होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. शंभर वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारे हे कायदे आता कालबाह्ण ठरत आहेत. जर अशा कायद्यांमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असेल तर ते बदलावे लागतील. आमच्या सरकारने तसा निर्णय घेतला असून लवकरच ते बदलण्यात येतील, असे खडसे म्हणाले.
शंभर रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंतचा शेतसारा भरला नाही म्हणून महसूल विभागाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीवर आपले नाव लावून त्या कागदोपत्री ताब्यात घेतल्या आहेत. अशा जमिनी कोल्हापूर जिल्ह्णातही आहेत. अशा शेतकऱ्यांचा सारा माफ करून ताब्यात घेतलेल्या जमिनी मूळमालकांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा विचार आहे, असे खडसे यांनी सांगितले.
राज्यातील अडीच एकरांच्या खाली शेतजमिनीचे तुकडे पाडले जात नाहीत. त्यामुळे जमिनीचा मालक असूनही त्यांना ७/१२ चा उतारा न मिळाल्याने लाखो शेतकऱ्यांची कुचंबणा होते म्हणून राज्यातील ‘तुकडे बंदी’चा कायदा रद्द करण्याचा निर्णयही सरकार घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मोजणीबाबतही
कडक नियम
शेतकऱ्यांच्या मोजणीबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मोजणीची प्रक्रिया खूप दिवस सुरू असते त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास होतो म्हणूनच आता ही प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. मोजणीकरीता नागरिकांना एक तारीख व वेळ दिली जाईल. त्या दिवशी मोजणी झालीच पाहिजे. जर झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस बुकावर त्याची नोंद करण्यात येईल. मागच्याच आठवड्यात याबाबत निर्णय घेतला आहे, असे खडसे म्हणाले.
प्रारंभी मंत्री खडसे यांनी कोनशिलेचे अनावरण केले. दीपप्रज्वलनाने समारंभास सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रास्ताविक केले. हातकणंगले, शिरोळ, चंदगड व आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी ७.२४ कोटींचा निधी मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभसंदेश वाचून दाखविला.
समारंभास खासदार संजयकाका पाटील, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, सुचित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील आदी उपस्थित होते.