महसूलच्या महिलांनी दिला धनगरवाड्यांवर प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:53 AM2021-03-09T10:53:46+5:302021-03-09T10:56:12+5:30
Women's Day Special Collcator Kolhpur- महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार, कौतुक सोहळा साजरा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी मात्र दुर्गम धनगरवाड्यांवर तेथील नागरिकांचे जगणे समजून घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्वखर्चाने दोन धनगरवाड्यांवर ४२ सौरकंदिल, नवीन कपडे व लहान मुलांसाठी खाऊ देऊन हा दिवस विधायकतेने साजरा केला.
कोल्हापूर : महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार, कौतुक सोहळा साजरा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी मात्र दुर्गम धनगरवाड्यांवर तेथील नागरिकांचे जगणे समजून घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्वखर्चाने दोन धनगरवाड्यांवर ४२ सौरकंदिल, नवीन कपडे व लहान मुलांसाठी खाऊ देऊन हा दिवस विधायकतेने साजरा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी महिला दिनाचा पारंपरिक उत्सव बाजूला सारत सकाळी नऊ वाजताच आजऱ्यातील हरपवडे येथील धनगरवाडे गाठले. आजही या भागात रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधादेखील या भागात अजून पोहोचलेल्या नाहीत, तिथे शासकीय योजना, जमिनींवरील हक्क हा विषय तर लांबच राहिला. अशा ठिकाणी चार किलोमीटरची पायपीट करून महिला कर्मचाऱ्यांनी तेथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वनिधीतून दोन्ही धनगरवाड्यांवरील ४२ कुटुंबांना सौरकंदिल दिले. महिला, पुरुष व लहान मुलांसाठी नवीन कपडे व खाऊ दिले.
या नागरिकांचे महसूलसंबंधीचे प्रश्न जाणून त्यांना दावे कसे करावेत, कोणती कागदपत्रे सादर करावीत याची माहिती दिली. यावेळी डी. के. शिंदे, मनीषा नाईक, स्नेहल जाधव, स्मिता संकपाळ, नम्रता शिराने, रिमा गणपते, रसिका कोडोलीकर, प्रदन्या थोरात, कविता जाधव यांची उपस्थिती होती.