कळे, घरपण, वारनूळ येथील लसीकरणाचा प्रांताधिकाऱ्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:42+5:302021-04-11T04:23:42+5:30
यावेळी ग्रामसेवक, तलाठ्यांनी नियोजन करून शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांनी लसीकरण संख्या वाढविणे, जनजागृती करणे, गृहभेटी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलेे, ...
यावेळी ग्रामसेवक, तलाठ्यांनी नियोजन करून शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांनी लसीकरण संख्या वाढविणे, जनजागृती करणे, गृहभेटी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलेे, तसेच लसीकरणासाठी प्रतिसाद न देणाऱ्यांचे प्रसंगी रेशन धान्य, शासकीय दाखले-उतारे रोखण्याच्या सूचना शासकीय यंत्रणेला केल्या, तसेच गावागावांतील ग्राम समित्यांनी कोविड लसीकरणासाठी जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी जि.प. सदस्य सर्जेराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एस. कवठेकर, विस्तार अधिकारी पी.डी. भोसले, एम.बी. चौगले, सरपंच सुभाष पाटील, उपसरपंच शांताबाई झुरे, ग्रा.वि.अधिकारी आर.आर. पाटील यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांची उपस्थिती होती.
फोटो ओळ
कळे : कोविड लसीकरणाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. कवठेकर. शेजारी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार शेंडगे, जि.प. सदस्य सर्जेराव पाटील आदी.