पाणी तपासणी विभागाचा आरोग्य मंत्र्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:46+5:302021-05-27T04:24:46+5:30
येथील मध्यवर्ती शासकीय कार्यालयात अनेक शासकीय कार्यालये एकाच छताखाली आहेत. प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी चालणाऱ्या प्रयोगशाळेची पाहणी ...
येथील मध्यवर्ती शासकीय कार्यालयात अनेक शासकीय कार्यालये एकाच छताखाली आहेत. प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी चालणाऱ्या प्रयोगशाळेची पाहणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत तेथील समस्या लवकरच दूर करण्याचे आश्वासन देऊन या प्रयोगशाळेतील कामकाजाबाबत मंत्री यड्रावकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. दातार उपस्थित होते. प्रयोगशाळेत पाण्याची अणू जैविक व रासायनिक तपासणी केली जाते. प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या अणू जैविक तज्ज्ञ प्रीती रमेश दुरुगकर यांनी याबाबतची माहिती दिली.
फोटो - २६०५२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथील पाणी तपासणी उपविभागीय प्रयोगशाळेत राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, डॉ. पी. एस. दातार, प्रीती दुरुगकर उपस्थित होत्या.