सुधारित : संशयित, पॉझिटिव्ह रुग्णांना घरी ठेवू नका जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले : ग्रामसमित्या, अधिकाऱ्यांना सक्त सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:34+5:302021-05-22T04:23:34+5:30

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णाला घरी ठेवू नका, अशी सक्त सूचना शुक्रवारी जिल्हाधिकारी ...

Revised: Do not keep suspicious, positive patients at home District Collector warns: Strict instructions to Gram Samiti, officials | सुधारित : संशयित, पॉझिटिव्ह रुग्णांना घरी ठेवू नका जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले : ग्रामसमित्या, अधिकाऱ्यांना सक्त सूचना

सुधारित : संशयित, पॉझिटिव्ह रुग्णांना घरी ठेवू नका जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले : ग्रामसमित्या, अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Next

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णाला घरी ठेवू नका, अशी सक्त सूचना शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ग्रामसमित्या व अधिकाऱ्यांना दिली.

ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, असेही त्यांनी बजावले. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही दोन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेलीच आहे. शिवाय मृत्युदरदेखील जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासंबंधी जिल्हाधिकारी देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामसमित्या, सरपंच, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फारुक देसाई उपस्थित होते. डॉ. साळे यांनी प्रारंभी कोरोना सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आपले गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान द्यावे, मागीलवर्षीप्रमाणे आतादेखील ग्रामसमित्यांनी सक्रियपणे काम करावे. पॉझिटिव्ह रुग्ण घरी राहिल्याने कुटुंबीयांतील इतरांचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांना घरी ठेवू नका, त्यांचे शाळा किंवा कोविड केंद्रात तातडीने विलगीकरण करा, याठिकाणी औषधे व सोयीसुविधा पुरवा, त्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करा. गावातील दानशूर व्यक्तींची मदत घ्या, तपासण्यांचे प्रमाण वाढवा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, त्यांचे स्वतंत्र नियोजन करा, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या.

--

Web Title: Revised: Do not keep suspicious, positive patients at home District Collector warns: Strict instructions to Gram Samiti, officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.