सुधारित - डॉ. संघवी यांचे वैद्यकीय, सामाजिक कार्य प्रेरणादायी : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:48+5:302021-06-16T04:31:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली ३५ वर्षे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी वैद्यकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली ३५ वर्षे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाचीही जोड दिली आहे. यातूनच त्यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यांचा सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वांनाच अनुकरणीय, प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम झाला. डॉ. संघवी यांनी परदेशी बनावटीचे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध केले आहेत. माजी खासदार महाडिक आणि त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते ते लोकार्पण केले.
या वेळी ॲड. प्रकाश हिलगे, कल्पना संघवी, स्नेहल संघवी-पुनाकर, जैनेश पुनाकर, नासीर बोरसदवाला, डॉ. गणेश खरात यांच्यासह रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
मोफत उपलब्ध होणार
परदेशी बनावटीचे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसाठी जैना यूएसए माजी अध्यक्ष दिलीप शहा व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे राजू मेहता यांचे सहकार्य लाभले. प्रतिमिनिट हवेतून सात लिटर्स ऑक्सिजन संकलित करण्याची क्षमता या उपकरणांची आहे. भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमधून गरजू लोकांना हे मशिन्स कोरोना रुग्णावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या शिफारशीवरून मोफत दिले जाणार आहे.