सुधारित......जिल्ह्यातील १०० विकास संस्थांच्या निवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:21+5:302021-01-16T04:29:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी (दि. १८) प्रारूप यादी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी (दि. १८) प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये कागल तालुक्यातील २६, तर पन्हाळा तालुक्यातील १८ संस्थांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२२ विकास संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
कर्जमाफी व नंतर कोरोनामुळे लांबणीवर टाकलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा बँक व ‘गोकुळ’ या शिखर संस्थांची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५९४ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत. यामध्ये २२२ विकास संस्थांचा समावेश असून, कागल तालुक्यातील २६, तर पन्हाळा तालुक्यातील १८ समावेश आहे. सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून, बुधवार(दि. २०)पर्यंत हरकती घेता येणार आहेत. १ ते ८ फेब्रुवारीपर्यंत हरकतीवर सुनावणी घेऊन निर्णय द्यायचा असून, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
तालुकानिहाय संस्था अशा -
तालुका संस्था
कागल २६
चंदगड ८
शाहूवाडी ६
गगनबावडा ५
पन्हाळा १८
शिरोळ १६
आजरा ४
राधानगरी ५
करवीर ३
गडहिंग्लज २
हातकणंगले ७
या संस्थांच्या लागल्या निवडणुका -
अशा होणार पहिल्या टप्प्यातील निवडणुका-
एकूण संस्था - ५९४
विकास -२२२
पतसंस्था - ‘क’ : १७६, ‘ड’ : १८६
‘अ’ वर्ग - १०