सुधारीत.. ‘राजाराम’च्या मोलॅसिसवरून मुश्रीफ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:30 AM2021-06-09T04:30:58+5:302021-06-09T04:30:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यातून खरेदी केलेल्या मोलॅसिसवरून ...

Revised .. Mushrif angry over Rajaram's molasses | सुधारीत.. ‘राजाराम’च्या मोलॅसिसवरून मुश्रीफ संतप्त

सुधारीत.. ‘राजाराम’च्या मोलॅसिसवरून मुश्रीफ संतप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यातून खरेदी केलेल्या मोलॅसिसवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्याने काहीसी सारवासारव केल्यानंतर संतप्त झालेल्या मुश्रीफ यांनी, कोणाशी बोलता याद राखा, शेतकऱ्यांचा पैसा आहे. यापुढे विना टेंडर खरेदी केली तर गाठ माझ्याशी आहे, असा दम दिला. कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी दोन महिन्याचा प्रशिक्षणार्थी कालावधी कोणत्या नियमात आहे? प्रशासन प्रमुख असताना आता हात वर करू नका, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना धारेवर धरले.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतरानंतर नेत्यांनी सोमवारी ‘अमृतकलश’ पूजन निमित्ताने दूध प्रकल्प कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

सध्याचे दूध संकलन, अस्थापनासह इतर बाबींवर होणारा खर्च, संघामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, दूध वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व त्यावरील खर्च, संघाची सध्याची आर्थिक स्थिती, आदी बाबींची माहिती कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी संघातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले. संचालक चुकीचे कारभार करीत असताना त्यांना रोखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती, मग तुम्हीही चुकीचा कारभार का केला? पूर्वीच्या सवयी चालणार नाही, मनमानी निर्णय खपवून घेणार नाही. तेरा लाख दूध संकलन असताना २० लाख लिटर दूध गृहित धरुन नोकरभरती केली. वर्षावरून सहा महिने आणि त्यानंतर दोन महिने प्रशिक्षणार्थी कालावधी केला. कार्यकारी संचालक म्हणून प्रशासनाचे प्रमुख तुम्ही होता, मग तुम्ही बेकायदेशीर काम का? केले? अशी विचारणा सतेज पाटील यांनी केली. टँकरचे ‘थ्रु’ पास बंद केलेत का? गेल्या पंधरा -वीस वर्षात झालेली लूट हळूहळू भरुन काढूया, असे के. पी. पाटील यांनी सूचना केल्याचे समजते.

बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजू आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, सुजित मिणचेकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते.

अतिरिक्त कर्मचारी डोकेदुखी

मागील संचालक मंडळाने गरज नसताना मोठी नोकरभरती केल्याने कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. सध्या २२५० कर्मचारी कार्यरत असून, त्याशिवाय ८०० कामगार कंत्राटी पद्धतीने घेतले जातात, यावर आक्षेप घेत अपवादात्मक हमाल व तांत्रिक कर्मचारी वगळता कंत्राटी कामगार घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या.

आता मुंबईलाही कर्मचारी जातील

‘गोकुळ’च्या मुंबई शाखेत काम करायला कोणी तयार नसल्याने तिथे कंत्राटी कर्मचारी घेतल्याचे कार्यकारी संचालक घाणेकर यांनी सांगितले. यावर, आता येथील कर्मचारीही मुंबईला जातील, असा सूचक इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

वर्षाला २७८ कोटीची खरेदी

‘गोकुळ’मधील वारेमाप खर्च पाहून नेत्यांसह नूतन संचालक चांगलेच अवाक झाले. वर्षाला २७८ कोटीची खरेदी होते. या खरेदीमध्ये किती बचत करता येईल, अशी विचारणा नेत्यांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही. यावर खरेदी पारदर्शी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: Revised .. Mushrif angry over Rajaram's molasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.