(सुधारित) रामानंदनगरात तीनपानी जुगार खेळणारे नऊ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:33+5:302021-09-05T04:29:33+5:30

कोल्हापूर : येथील रामानंदनगरात पोवार कॉलनीत मोकळ्या जागेत तीनपानी जुगार खेळणाऱ्या नऊजणांना करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ...

(Revised) Nine Gajaads playing gambling in Ramanandnagar | (सुधारित) रामानंदनगरात तीनपानी जुगार खेळणारे नऊ गजाआड

(सुधारित) रामानंदनगरात तीनपानी जुगार खेळणारे नऊ गजाआड

Next

कोल्हापूर : येथील रामानंदनगरात पोवार कॉलनीत मोकळ्या जागेत तीनपानी जुगार खेळणाऱ्या नऊजणांना करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन दुचाकी आणि आठ मोबाईल असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्यांची नावे अशी : संजय आण्णाप्पा वाडकर (वय ४१, रा. पोवार कॉलनी, रामानंदनगर), लखन ऊर्फ अनिल रोहन चौगुले (३० रा. दत्त कॉलनी, रामानंदनगर), सागर संभाजी पाडळकर (४१ पाडळकर कॉलनी, हॉकी स्टेडियमनजीक), गुलाब हारुण मुजावर (५० रा. माळी कॉलनी, टाकाळा), दीपक पांडुरंग जाधव (३५ रा. कातळेवाडी, ता. शाहूवाडी), विश्वित सूर्यकांत कोळी (२५ रा. रामानंदनगर), शिवाजी चंद्रकांत पाटील (४० रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), सौरभ महावीर कांबळे (२२ रा. पोवार कॉलनी, रामानंदनगर), जयराम कृष्णात पिल्ले (३८ रा. मारुती मंदिरमागे, रामानंदनगर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगरात पोवार कॉलनीत संजय वाडकर यांच्या घराच्या बाजूला उघड्यावर तीनपानी पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकला. त्यावेळी मोकळ्या जागेत तीनपानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नऊजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ मोबाईल, २ दुचाकी असा सुमारे १ लाख २८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फोटो नं. ०४०९२०२१-कोल-क्राईम०१

ओळ : कोल्हापुरात रामानंदनगरातील पोवार कॉलनीत तीनपानी जुगार खेळणाऱ्या नऊजणांना करवीर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून अटक केली.

040921\04kol_9_04092021_5.jpg

ओळ : कोल्हापूरात रामानंद नगरातील पोवार कॉलनीत तीन पानी जुगार खेळणाऱ्या नऊजणांना करवीर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून अटक केली.

Web Title: (Revised) Nine Gajaads playing gambling in Ramanandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.