आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:18+5:302021-04-02T04:24:18+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनी कोरोनासाठी आरटीपीसीआर तपासणीच्या दराबाबतचे यापूर्वी निश्चित केलेले दर अधिक्रमित करून सर्व करांसहित सुधारित दर निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने कोविड चाचणीचे दर कमी केले आहेत. हे सुधारित दर आता शासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांमार्फत तसेच रॅपिड ॲन्टिजेन, ॲन्टिबॉडीज, ट्रूनॅट, सीबी नॅटद्वारे तपासणीसाठीही दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर, रॅपिड ॲन्टिजेन, ॲन्टीबॉडीज, ट्रूनॅट, सीबी नॅट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधित प्रयोगशाळा व तपासणी केंद्रांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
--
खासगी प्रयोगशाळांसाठीचे दर खालीलप्रमाणे
संकलन ठिकाणावरून नमुने घेणे : ५०० रुपये
कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधून नमुना घेणे : ६०० रुपये
रुग्णाच्या घरून नमुना घेणे : ८०० रुपये
--
तपासणीचा प्रकार : रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास : केंद्रावरून एकत्रित तपासणी नमुने : रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी
इलीसा फॉर सार्स ॲन्टिबॉडी टेस्ट: २५० : ३०० : ४००
सीलीया फॉर सार्स ॲन्टिबॉडी टेस्ट : ३५० : ४५० : ५५०
रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट : १५० : २०० : ३००
सीबी-ट्रूनेट : १२००
---