सुधारित : ‘स्वाभिमानी’चा लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका : राजू शेट्टी यांची माहिती : मंत्र्यांची दालने सजवायला पैसा कोठून आला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:01+5:302021-03-04T04:47:01+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर ...

Revised: 'Swabhimani' soon erupts in statewide agitation: Raju Shetty | सुधारित : ‘स्वाभिमानी’चा लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका : राजू शेट्टी यांची माहिती : मंत्र्यांची दालने सजवायला पैसा कोठून आला?

सुधारित : ‘स्वाभिमानी’चा लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका : राजू शेट्टी यांची माहिती : मंत्र्यांची दालने सजवायला पैसा कोठून आला?

Next

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे दिला. गोरगरिबांची वीज बिले माफीसाठी सरकारकडे पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजविण्यासाठी पैसे कोठून आले? असा सवालही त्यांनी केला.

धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला लावून स्वागत केले. त्यावेळी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. कारंडे यांच्यामुळे स्वाभिमानीला हातकणंगले तालुक्यात बळ मिळणार आहे.

लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठी सहा महिने ओरडतोय. सत्तापिपासू भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत गेलो, म्हणजे त्यांनी कोणतेही निर्णय घेतले तर ते मान्य करायला आम्ही बांधील नाही. शिक्षण संस्थाचालकांनी चालविलेल्या फीच्या सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांचे कान ओढावेत. मुले महाविद्यालयात नाहीत, शिक्षकांना पगारही नाहीत, मग यांना फी लागते कशाला? लुटायचे तरी किती? आता गप्प बसणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

संदीप कारंडे म्हणाले, राजू शेट्टी यांच्यासारख्या चळवळीतील नेत्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आगामी काळात ‘स्वाभिमानी’ची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, संदीप जगताप, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, सागर शंभूशेटे, आदी उपस्थित होते.

थकवा गेल्यानंतर राज्यपाल सही करतील

बारा विधानपरिषद सदस्य नियुक्तीवर राज्यपाल कधी सही करायची ते करू देत. ते दमलेले आहेत, त्यांचा थकवा गेल्यानंतर कदाचित सही करतील. आमदारकी साधन आहे, साध्य नाही. ती नाही मिळाली तरी काही फरक पडत नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला.

Web Title: Revised: 'Swabhimani' soon erupts in statewide agitation: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.