(सुधारीत) टेंबलाईवाडीतील दोघे चेन चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:09+5:302021-06-23T04:17:09+5:30

कोल्हापूर : कृषी महाविद्यालय परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून धूम स्टाईलने पळून गेलेल्या दोघा दुचाकीस्वारांना ...

(Revised) Two chains stolen from Tembalaiwadi | (सुधारीत) टेंबलाईवाडीतील दोघे चेन चोरटे गजाआड

(सुधारीत) टेंबलाईवाडीतील दोघे चेन चोरटे गजाआड

Next

कोल्हापूर : कृषी महाविद्यालय परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून धूम स्टाईलने पळून गेलेल्या दोघा दुचाकीस्वारांना राजारामपुरी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांत गजाआड केले. शुभम प्रभाकर कबाडे (वय २१), शुभम गणेश शिपुगडे (वय २२, दोघे टेंबलाईवाडी) अशी अटक केलेल्या दोघा संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरीतील सोन्याचे दागिने असा सुमारे लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता जनार्दन कांबळे (वय ५० रा. आंबेडकरनगर, सरनोबतवाडी) ह्या कृषी महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहात सफाईचे काम करतात. सोमवारी सायंकाळी त्या सफाईचे काम संपवून सायंकाळी कृषी महाविद्यालयपासून मधल्या रस्त्यावरून सरनोबतवाडीकडे घरी पायी जात होत्या, त्याचवेळी पाठीमागून पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन दुचाकी ढकलत आलेल्या दोघा दुचाकीचालकांनी खणीजवळ येताच त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र व लक्ष्मीहार हिसडा मारुन चोरला. त्याचवेळी कांबळे यांनी हाताने दागिने पकडले. त्यावेळी निम्माच लक्ष्मीहार त्यांच्या हाती लागला. इतर दागिने चोरट्याने चोरुन नेले. या चोरीची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली.

दरम्यान, घटनेनंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पो. नि. सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथके चोरट्यांच्या शोधासाठी बाहेर पडले. त्यावेळी या पथकाने टेंबलाई मंदिराकडील मुख्य रस्त्यावरून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी त्याची नावे संशयित कबाडे व शिपुगडे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६० हजारांचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपनिरीक्षक अनिल शिराळे, कर्मचारी समीर शेख, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर यांनी केली.

फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपुरी पोलीस स्टेशन०१

ओळ : कृषी महाविद्यालय परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरणा-या दोघा चोरट्यांचा राजारामपुरी पोलिसांनी चोवीस तासांत गजाआड केले. यावेळी दोन संशयित चोरट्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व जप्त केलेली दुचाकी.

फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपुरी पोलीस स्टेशन०२

ओळ : दोघा चोरट्यांकडून जप्त केलेले गुन्ह्यातील सोन्याचे दागिने.

===Photopath===

220621\22kol_4_22062021_5.jpg~220621\22kol_5_22062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपूरी पोलीस स्टेशन०१ओळ : कृषी महाविद्यालय परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरणार्या दोघा चोरट्यांचा राजारामपूरी पोलिसांनी चोवीस तासात गजाआड केले. यावेळी दोन संशयीत चोरट्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व जप्त केलेली दुचाकी.फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपूरी पोलीस स्टेशन०२ओळ : दोघा चोरट्यांकडून जप्त केलेले गुन्ह्यातील सोन्याचे दागिणे.~फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपूरी पोलीस स्टेशन०१ओळ : कृषी महाविद्यालय परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरणार्या दोघा चोरट्यांचा राजारामपूरी पोलिसांनी चोवीस तासात गजाआड केले. यावेळी दोन संशयीत चोरट्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व जप्त केलेली दुचाकी.फोटो नं. २२०६२०२१-कोल-राजारामपूरी पोलीस स्टेशन०२ओळ : दोघा चोरट्यांकडून जप्त केलेले गुन्ह्यातील सोन्याचे दागिणे.

Web Title: (Revised) Two chains stolen from Tembalaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.