मतदार याद्यांचे गुरुवारपासून पुनरीक्षण

By admin | Published: October 5, 2015 12:42 AM2015-10-05T00:42:06+5:302015-10-05T00:49:48+5:30

अमित सैनी यांची माहिती : ११ व १८ आॅक्टोबरला विशेष मोहीम; नवमतदार नोंदणी ७ नोव्हेंबरपर्यंत

Revision of voter lists from Thursday | मतदार याद्यांचे गुरुवारपासून पुनरीक्षण

मतदार याद्यांचे गुरुवारपासून पुनरीक्षण

Next

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारी २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गुुुरुवारी (दि. ८) प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाणार असून, या दिवसापासून हा कार्यक्रम जिल्ह्णात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. नवमतदार नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सैनी म्हणाले, छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार गुरुवारी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, गुरुवार (दि. ८) ते ७ नोव्हेंबर - दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, १४ आॅक्टोबर रोजी मतदार याद्यांमधील संबंधित ग्रामसभा, स्थानिक संस्थांत वाचन व नावांची खातरजमा करणे, ११ व १८ आॅक्टोबर या दोन दिवशी विशेष मोहीम, ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, २४ डिसेंबरपर्यंत डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि १६ जानेवारी २०१६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.ते पुढे म्हणाले, जिल्ह्णातील मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याने मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी. मतदारांनी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मतदान मदत केंद्रावर फॉर्म भरून द्यावेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी फॉर्म ८ आणि मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी फॉर्म ८ अ मतदान मदत केंद्रांवर मिळतील.
या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान मदत केंद्र कार्यान्वित केल्या आहेत. विशेष मोहिमेदिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित राहतील; तसेच या मतदान केंद्रांवर सर्व फॉर्म मिळतील. विशेष मोहीम काळात मतदान केंद्रांवर उपस्थित न राहणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार रामहरी भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)



जिल्ह्यात २९ लाख मतदार
२१ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्णातील १० विधानसभा मतदार संघात २९ लाख २८ हजार ८८३ इतके मतदार आहेत. यामध्ये १५ लाख १३ हजार ७०६ महिला मतदार, १४ लाख १५ हजार ११७ पुरुष मतदार आणि ६० इतर मतदारांचा समावेश आहे. विधानसभानिहाय मतदार संख्या अशी - चंदगड - ३ लाख ३२, राधानगरी- ३ लाख ६ हजार, ६११, कागल- २ लाख ९९ हजार ८५१, कोल्हापूर दक्षिण- ३ लाख १२ हजार २९, करवीर- २ लाख ९० हजार ४५३, कोल्हापूर उत्तर- २ लाख ८५ हजार ८०३, शाहूवाडी- २ लाख ६६ हजार ८२६, हातकणंगले- ३ लाख ४ हजार ९४०, इचलकरंजी- २ लाख ७१ हजार २५०, शिरोळ- २ लाख ९१ हजार ८८.


हा कार्यक्रम महापालिका निवडणुकीशी निगडित नाही
मतदार याद्यांचा विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी
होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमांशी निगडित नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी
स्पष्ट केले.
१६ जानेवारी २०१६ रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ही सन २०१६ व २०१७ मध्ये सुरुवातीच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मूळ मतदार यादी म्हणून वापरण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविल्याचेही त्यांनी सांगितले.


राजकीय पक्षांनी योगदान द्यावे
पत्रकार परिषदेपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्ह्णातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही विशेष बैठक जिल्हाधिकारी सैनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या संपूर्ण कार्यक्रमाबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी दिलीप पवार, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते.

Web Title: Revision of voter lists from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.