काँग्रेसला मिळालेल्या अध्यक्ष पदाने राधानगरी काँग्रेसमध्ये नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:55+5:302021-07-15T04:18:55+5:30
भोगावती : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पी. पाटील यांच्या निवडीमुळे राधानगरी तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण ...
भोगावती :
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पी. पाटील यांच्या निवडीमुळे राधानगरी तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रतिनिधित्व देखील केले आहे. मात्र तालुक्यातील काँग्रेसमध्ये गटबाजीला कंटाळून वरिष्ठांनी केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम होऊन काँग्रेसची हानी झाली आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे.
भोगावती साखर कारखाना, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेस दोन, जिल्हा परिषद सदस्य तीन सदस्य व पंचायत समितीचे तीन सदस्य, भोगावतीचे तेरा संचालक आहेत. मात्र गटांतर्गत राजकारणाचा फटका अनेकवेळा बसला आहे.
करवीर तालुक्यातील भोगावती परिसरामध्ये पी. एन. पाटील यांची मोठी ताकद आहे. एकमुखी नेतृत्व असूनही तालुक्यात एकवाक्यतेचा अभाव आहे. राधानगरीचे माजी उपसभापती रवीश पाटील (कौलवकर), काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील (कौलवकर), पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील (येळवडेकर), भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, सरपंच सुभाष पाटील (सिरसे), सुनील चौगले (ठिकपुरली), जयवंत कांबळे (खिंडी व्हरवडे) सरपंच अभिजित पाटील (गुडाळ), रवींद्र पाटील (तारळे), माजी सरपंच विलास पाटील (सोन्याची शिरोली), शहाजी कवडे (आवळी बुद्रुक), जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, प्रभाकर पाटील (चंद्रे), माजी सरपंच सागर धुंदरे (राशिवडे बुद्रुक), प्रभाकर धामणे (तरसंबळे) आदींसह अनेक तरुण कार्यकर्त्यांची फौज राहुल पाटील यांच्या पाठीशी सध्या सज्ज आहे. त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.