आंदोलनातील गुन्हे मागे घ्या:संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:49 AM2018-07-30T00:49:54+5:302018-07-30T00:50:00+5:30
<p>
कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फेबेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी सहाव्या दिवशी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत रोखठोक भूमिका मांडली. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, अॅड. गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, विनायक फाळके, संदीप पाटील, उमेश पोवार, हेमंत साळोखे, संजय पोवार, गणी आजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, माझी खासदारकी ही बहुजन समाजासाठी असून, या पदाची शपथ घेतल्यानंतर कोपर्डीसह मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ते शांततेत सुरू असून, अद्याप आपण हातात काठी घेतलेली नाही. सरकारकडून निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये. आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत आपण करणार नाही, तर संपूर्ण समाजच याचे नेतृत्व करील. त्यामागे आपण राहू.
ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत; कारण ते गुन्हेगार नसून समाजाच्या मागण्यांसाठी लढत आहेत. हे गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर आपण स्वत: रस्त्यावर उतरू. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोक एकत्र येत आहेत, हे आनंददायी आहे.
आत्ताच मराठा
खासदारांनी तोंड उघडले
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वप्रथम संसदेत आपण आवाज उठविला, त्यावेळी एकाही मराठा खासदाराने तोंड उघडले नाही. आता मात्र जो-तो बोलत आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.
माझे तीन विरोधक
संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात माझे तीन विरोधक या व्यासपीठावर आहेत, असे म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यावर पुढे भाषण सुरू ठेवत आपण या विरोधकांना फोन करून काय केले पाहिजे, असे विचारले.