‘लोकमत दीपोत्सव’योजनेत बक्षिसांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 01:06 AM2016-10-18T01:06:46+5:302016-10-18T01:09:32+5:30

बंपर बक्षीस ‘दोन दुचाकी’ : लाखो रूपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार

Reward prizes in 'Lokmat Dipotsav' scheme | ‘लोकमत दीपोत्सव’योजनेत बक्षिसांचा वर्षाव

‘लोकमत दीपोत्सव’योजनेत बक्षिसांचा वर्षाव

googlenewsNext

कोल्हापूर : व्यावसायिकांना दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरातींद्वारे आपल्या उत्पादनांची व वस्तूंची माहिती पोहोचवता यावी. ग्राहकांना दसरा-दिवाळीच्या खरेदीचा मनसोक्त आनंद लुटता यावा व लाखोंच्या बक्षिसांनी त्यांचा उत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा, या दुहेरी उद्देशाने ‘लोकमत दीपोत्सव २०१६’ या योजनेचे मुख्य प्रायोजक राजाकाका ई-मॉल व मे.गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत आयोजित केले आहे. मंगलमय उत्साहाच्या आनंददायी शॉपिंगची संधी देणाऱ्या योजनेत बंपर बक्षीस ‘दोन दुचाकी’सह एकूण लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
या योजनेंतर्गत ग्राहकांसाठी भव्य ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्राहकांनी ‘लोकमत दीपोत्सव २०१६’ योजनेतील सहभागी व्यावसायिकांच्या दुकानांतून वस्तूंची खरेदी केल्यास त्यांना एक कूपन देण्यात येईल. त्यात विजेत्या ठरलेल्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. योजनेचा कालावधी १ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर असून, या कालावधीत ग्राहकांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेचे लक्ष्मी सोलर, व्ही. काकडे सराफ, स्टार लाईट मोबाईल स्टोअर, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीटस्, हे सहप्रायोजक आहेत.
या योजनेतील बंपर प्राईज ड्रॉ विजेत्याला एक मोटारसायकल व एक मोपेड ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे. योजनेत तीन ड्रॉ काढण्यात येणार असून, दसऱ्यानंतरच्या ड्रॉसाठी प्रथम क्रमांक विजेत्याला ३२ इंची एलडी टीव्ही, द्वितीय विजेत्याला ९ हजार ९९९ रुपयांचे सोने, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना वॉशिंग मशीन, चौथ्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना मायक्रो ओव्हन, पाचव्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना होम थिएटर, सहाव्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना सोलर होमलाईट, सातव्या क्रमांकाच्या दोन विजेत्याला वॉटर क्युरीफाईड, आठव्या क्रमांकाच्या पाच विजेत्यांना मोबाईल आणि नवव्या क्रमांकाच्या दोन विजेत्यांना इडेक्शन बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
याव्यतिरिक्त बक्षिस योजनेतून उत्तेजनार्थ बक्षिसेही ग्राहकांना जिंकण्याची संधी आहे, तरी ग्राहकांनी सहभागी व्यावसायिकांकडून अधिकाधिक वस्तू, साहित्याची खरेदी करावी व आकर्षक बक्षिसांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, योजनेत सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र ड्रॉ आयोजित केला आहे.
या ड्रॉमधील विजेत्याला ३२ इंची एलईडी टी. व्ही. बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. या योजनेस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)

ग्राहकांनी दसरा-दिवाळीच्या खरेदीचा मनसोक्त आनंद लुटावा
मुख्य प्रायोजक राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत आयोजित
शॉपिंगची संधी देणाऱ्या योजनेत बंपर बक्षीस ‘दोन दुचाकी’सह एकूण लाखोंची बक्षीसे

Web Title: Reward prizes in 'Lokmat Dipotsav' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.