सामाजिक संस्थांनी पुरस्कार दिल्याने प्रेरणा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:39+5:302021-09-27T04:26:39+5:30
येथील सहारा फाऊंडेशनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
येथील सहारा फाऊंडेशनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हाळवणकर होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सोमनाथ रसाळ, उपसरपंच सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, अशोक पाटील, रिटा रॉड्रिक्स यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील तसेच कोरोना व पूरपरिस्थितीवेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांना ‘राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सहारा फाऊंडेशनचे संस्थापक पापालाल सनदी यांनी स्वागत व पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, पंचायत समितीचे सभापती प्रदीप पाटील, उपसभापती पूनम शिंदे, सरपंच शोभा पोवार, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, नगरसेवक मनोज हिंगमिरे, सुधाराणी पाटील, सचिन आंबी, जैत भोकरे, महेश कांबळे, महेश जाधव आदी उपस्थित होते. रिजवान चमनशेख यांनी सूत्रसंचालन केले तर परवेज सनदी यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०३
कबनूर (ता. हातकणंगले) येथील सहारा फाऊंडेशनने ‘राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार’प्राप्त व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
(छाया : तानाजी पाटील, कबनूर.)