रिक्षा संघटनेची उद्या निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:44+5:302021-08-23T04:26:44+5:30
सुधीर मुतालिक यांचा बुधवारी सत्कार कोल्हापूर : सीआयआयचे राज्य अध्यक्ष सुधीर मुतालिक यांचा बुधवारी (दि. २५) दुपारी साडेचार वाजता ...
सुधीर मुतालिक यांचा बुधवारी सत्कार
कोल्हापूर : सीआयआयचे राज्य अध्यक्ष सुधीर मुतालिक यांचा बुधवारी (दि. २५) दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. यावेळी ‘औद्योगिक समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यामध्ये मुतालिक हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव दिनेश बुधले यांनी दिली.
गोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोपे वाटप
कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधील विद्यार्थ्यांना उद्योजक अवधूत नाईक आणि संजय जोशी यांच्यावतीने विविध ४०० रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात सिल्ह्वर ओक, करंज, अशोक, बदाम, आपटा, पाम, बांबू, जांभूळ, गुलमोहर, आदी रोपांचा समावेश आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते रोपांचे वाटप झाले. यावेळी पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. मंजिरी मोरे, प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, आदी उपस्थित होते. प्रमोद झावरे यांनी स्वागत केले. सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव
कोल्हापूर : येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम बुधवारी झाला. त्यामध्ये अपूर्वा गरडकर, स्वर्णिका कराळे, प्रणाली चौगुले यांचा शाळा समितीच्या अध्यक्षा उत्कर्षा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वर्णिका हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका एस. आर. चौगले, उपमुख्याध्यापक एम. सी. जयकर, गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या यु. आर. भेंडीगिरी, आदी उपस्थित होते. या विद्यार्थिनींना दि. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, को-ऑर्डिनेशन कमिटी अध्यक्ष नितीन वाडीकर, सचिव प्रभाकर हेरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.