रिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:59 PM2019-12-20T17:59:09+5:302019-12-20T18:00:28+5:30

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असणारे रस्ते केले जात नसल्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.

Rickshaw businessmen march on municipal corporation | रिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा

शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात वाहनधारक महासंघाने आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी रिक्षासह महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिका चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चाखराब रस्ते तातडीने करण्याची मागणी : अधिकाऱ्यांची खरडपट्टी

कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असणारे रस्ते केले जात नसल्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघटनेने शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात गेल्या महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १५ दिवसांत रस्ते करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्यामुळे वाहनधारक महासंघाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, सभागृह नेते दिलीप पोवार यांना वाहनधारक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनधारक संघटनेचे चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, दिनमहमंद शेख, नीलेश हंकारे, पुष्पक पाटील, इंद्रजित आडगुळे, वसंत पाटील, संजय केसरकर, अतुल माळकर, उदय गायकवाड, दीपक पोवार उपस्थित होते.

 

 

Web Title: Rickshaw businessmen march on municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.