रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:56+5:302021-05-29T04:18:56+5:30

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगरातील इंदिरासागर सभागृहात रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. ...

Rickshaw driver grant registration facility started | रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा सुरू

रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा सुरू

googlenewsNext

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगरातील इंदिरासागर सभागृहात रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या नोंदणी अभियानाची सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाली. या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रिक्षा परवानाधारकांना १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी हे तीन दिवसीय नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक सोबत घेऊन ही ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षाचालकांना खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, दीपक थोरात, अभिजित देठे, पार्थ मुंडे, देवेंद्र सरनाईक, रोहित गाडीवडर, उदय पोवार, कुणाल पत्की, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, पूजा आरडे आदी उपस्थित होते.

फोटो : २८०५२०२१-कोल-ऋतुराज पाटील

आेळी : कोल्हापुरातील संभाजीनगरातील इंदिरासागर सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत रिक्षाचालक अनुदान नावनोंदणी सुविधा सुरू करण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील व माजी नगरसेवकांसह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Rickshaw driver grant registration facility started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.