रिक्षा अनुदान वाटप ॲप आजपासून कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:08+5:302021-05-22T04:23:08+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटक म्हणून रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्याकरिता परिवहन कार्यालयाने ...

Rickshaw grant distribution app will be operational from today | रिक्षा अनुदान वाटप ॲप आजपासून कार्यान्वित होणार

रिक्षा अनुदान वाटप ॲप आजपासून कार्यान्वित होणार

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटक म्हणून रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्याकरिता परिवहन कार्यालयाने रिक्षाचालकांची माहिती भरण्यासाठी संगणकीय प्रणाली (ॲप) तयार केली आहे, त्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने रिक्षा संघटना, ड्रायव्हिंग स्कूल आणि विमा प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. ॲप सुरू झाल्यानंतर दोन दिवसांत प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

या अनुदानासाठी पात्र असलेल्या रिक्षा परवानाधारकांची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता परिवहन विभागाने संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. त्याची माहिती देण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी ऑनलाईन पद्धतीने त्याची माहिती रिक्षा संघटनांसह विविध प्रतिनिधींना दिली. ही सर्व माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. अर्ज करणे सोपे केले आहे. तरीसुद्धा रिक्षाचालकांना रिक्षा संघटनांसह विद्यार्थी, युवक, विमा प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अर्ज भरण्यास मदत करावी. रिक्षाचालकांनी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करावे, असे आवाहनही डाॅ. अल्वारीस यांनी केले आहे.

परवानाधारक रिक्षाचालक : १५ हजार २८७

मिळणारी मदत : २ कोटी ३० लाख

ऑनलाईन अर्जासाठी हे लागणार

या अनुदानासाठी रिक्षाचालकांनी केवळ ऑटोरिक्षा क्रमांक, लायसन्स, आधारकार्ड आदींचा वापर करावयाचा आहे. वारसांच्या प्रकरणांमध्ये परवान्यासह मूळ प्रतीची आवश्यकता लागणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईनच आहे.

दहा ठिकाणी सोय..

ॲपद्वारे रिक्षाचालकांना अनुदानासाठी अर्ज भरताना जर काही अडचण आल्यास त्याची माहिती देण्यासाठी दहा ठिकाणी सोय करण्यात आली आहे. याकरिता चंद्रकांत भोसले, राजू जाधव, विजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Rickshaw grant distribution app will be operational from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.