रिक्षाचालकांचे बजेट कोलमडले
By admin | Published: January 8, 2016 12:22 AM2016-01-08T00:22:20+5:302016-01-08T00:51:25+5:30
दोनशेचे झाले हजार : परवाना नूतनीकरण शुल्क पाचपटीने वाढले
कोल्हापूर : अॅटो रिक्षाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी पूर्वी दोनशे रुपये शुल्क आकारणी प्रादेशिक परिवहनकडून केली जात होती. मात्र, नव्या बदलानुसार आता हेच शुल्क एक हजार रुपये इतके आकारले जाणार आहे. या बदलामुळे रिक्षाचालकांचे बजेटच कोलमडणार असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा परवाना (परमिट) नूतनीकरणासह नवीन परमिट खरेदी करण्यासाठी दोनशेचे दहा हजार रुपये केल्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे रिक्षाचालकांच्यात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. हे शुल्क त्वरित रद्द न रद्द केल्यास आंदोलनाचा पवित्रा रिक्षाचालक घेणार आहेत.
वाढती स्पर्धा आणि महागाईमुळे आधीच रिक्षाचालक बेजार झाले आहेत. यापूर्वी रिक्षा परमिट दोनशे रुपये इतके होते. त्यात पाचपटीने वाढ म्हणजे एक हजार रुपये इतके शुल्क वाढले आहे. याशिवाय रिक्षा परमिट नव्याने खरेदी करणेही बेरोजगारांना शक्य नाही. त्यात पूर्वी दोनशे रुपये इतके शुल्क आकारले जात होते. मात्र, तेच शुल्क दहा हजाराच्या घरात गेले आहे. टॅक्सीसाठीही हीच बाब आता वीस हजार रुपयांवर गेली आहे. या शुल्क वाढीने रिक्षा व टॅक्सीचालकांचे कंबरडेच मोडणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्णात १५ हजारांवर रिक्षा आहेत. (प्रतिनिधी)
परवाना शुल्क वाढ अशी
वाहनाचा प्रकारनवीन दरपूर्वीचे दर
रिक्षा१०००२००
मोटर कॅब१०००२००
मॅक्सी कॅब१०००२००
टप्पा वाहतूक दर१०००४००
मालवाहतूक१०००६००
पर्यटक कॅब२०००६००
मोठी पर्यटक वाहने५००० ६००
तडजोड शुल्कही वाढले
वाहन प्रकार परवाना तडजोड शुल्क
निलंबन
रिक्षा, मीटर टॅक्सी, लहान किमान दररोज पाच रुपये,
मालवाहतूक वाहन१० दिवसकमाल दोन हजार रुपये
टूरिस्ट, आरामबस, टॅक्सी किमान दररोज तीस रुपये,
१० दिवसकमाल पाच हजार रुपये
प्रवासी वाहने, किमान दररोज ५० रुपये,
मालवाहू वाहने१० दिवसकमाल दहा हजारांपर्यंत
गणवेशही पांढरा होणार
राज्य शासनाच्या गृहविभागाने आॅक्टोबर २०१५ मध्ये एका अध्यादेशाद्वारे राज्यातील आॅटो रिक्षाचालक व टॅक्सीचालक यांना पूर्वी वापरत असलेल्या ‘खाकी ’ गणवेशाऐवजी ‘पांढरा’ गणवेश वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा गणवेश पांढरा दिसणार आहे.
राज्य शासनाने रिक्षाचालकांचा व्यवसाय सध्या कसा चालला आहे, याचा सर्व्हे करावा. मग परमिट आदी शुल्कांमध्ये वाढ करावी, अन्यथा हा सार्वजनिक वाहतुकीला मदत करणारा व्यवसाय कोलमडून पडेल.
टप्प्याटप्याने शुल्कात वाढ केली असती तर बरे झाले असते.
-शिवाजी पाटील अध्यक्ष, विद्यार्थी वाहतूक संघटना