रिक्षाचालकांना मिळणार दोन लाखांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:33+5:302021-02-05T07:11:33+5:30
कोल्हापूर : येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि आंतरराष्ट्रीय काररेसर कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर शहर, ग्रामीण ...
कोल्हापूर : येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि आंतरराष्ट्रीय काररेसर कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर शहर, ग्रामीण भागातील सर्व रिक्षाचालक, मालकांचा दोन लाख रुपयांचा विमा मोफत उतरविणार आहेत. प्रजासत्ताकदिनी मंगळवारी हा सामाजिक उपक्रम ते राबविणार आहेत. त्यासाठी त्यांनी ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडिंग कंपनीच्या पेट्रोलपंपावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत विशेष शिबिर आयोजित केले आहे.
कोरोनामुळे रिक्षा व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील तीन आसनी रिक्षा आणि आपे रिक्षाचालकांसाठी दोन लाख रुपयांचा मोफत विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या शिबिराला येताना रिक्षाचालक, मालकांनी बँकेचे पासबुक आणि जर बँकेत खाते नसेल तर आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड आणि दोन फोटो घेऊन यावे या उपक्रमाचा जास्तीत जास्त रिक्षा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केले आहे.