सध्या योगा, प्राणायामाची खरी गरज - जयंत आसगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:29+5:302021-06-22T04:16:29+5:30
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत योगाचे मूळ आहे, सध्या कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसावर आक्रमण होत आहे, या महामारीत योगा, प्राणायामाच्या माध्यमातून ...
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत योगाचे मूळ आहे, सध्या कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसावर आक्रमण होत आहे, या महामारीत योगा, प्राणायामाच्या माध्यमातून शरीर व मन सुदृढ ठेवता येते. आपल्या कुटुंबाला महामारीतून वाचविण्यासाठी योगा करावा, असे आवाहन सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव, आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.
कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयाच्या जिमखाना, सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्यावतीने ७ व्या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘योगा फॉर फिटनेस’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर होते. प्राचार्य कुरळपकर यांनी अष्टांग योग, नियम, आसन, शारीरिक व्यायाम शरीर सुदृढ बनवते, व्याधी दूर करते, असे सांगितले.
यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सहाय्यक शिक्षक योगप्रवीण ए. एस. डाकरे यांनी योगा प्रात्यक्षिके करून घेतली. स्वागत संयोजक जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. अभिजित वणीरे यांनी केले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. पी. चौगले यांनी केले तर प्रा. डी. बी. माने यांनी आभार मानले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.