कोल्हापूर: नृसिंहवाडीतील दत्त मंदिराला कृष्णेचा वेढा, निम्मे मंदिर पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:32 AM2022-07-14T11:32:28+5:302022-07-14T11:35:16+5:30
रमेश सुतार बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सतंतधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नृसिंहवाडी येथील कृष्णा ...
रमेश सुतार
बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सतंतधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चोवीस तासात एक फूटाने वाढ झाली आहे. त्यामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराला पाण्याचा वेढा पडला. निम्मे मंदिर पाण्याखाली गेले होते.
मंदिरात पाणी आल्याने श्री ची उत्सवमुर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मठात ठेवली आहे. कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगम असलेले संगम मंदिर पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, काल बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राहूल रेखावर यांनी नृसिंहवाडी येथे पूर पाहणी केली आहे. यावेळी संभाव्य पूराचा धोका बघता नागरिकांनी स्थलांतरासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले आहे.
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठलगत असणाऱ्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.