दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:30 PM2020-06-03T16:30:52+5:302020-06-03T16:32:09+5:30
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.
कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.
सध्या पुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका होऊ नये म्हणून बंधाऱ्याच्या सर्व लोखंडी प्लेटा नुकत्याच काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंधार्याची पाणी पातळी झपाट्याने खाली खाली चालली होती. मात्र बंधाऱ्याच्या प्लेटा काढूनही दमदार पावसाने गेल्या चार दिवसांपासून झोडपायला सुरुवात केल्याने पाणी पातळीत वाढ होत चालली आहे.
राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्यासाठी सध्या केवळ चार फुट पाणी पातळी कमी आहे. पाऊस असाच धो धो पडत राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. बंधारा एकदा पाण्याखाली गेला की या मार्गावरून वडणगे, निगवे, भुये, केर्ली मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. तसेच औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा लांबचा पल्ला टाकून जावे लागते. त्यामुळे हा बंधारा पाण्याखाली गेला की नाही याकडे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांचे नेहमीच लक्ष लागून असते.