ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल १२२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:45+5:302021-04-24T04:23:45+5:30

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: शहरी भागात अजूनही कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्या जास्त असली तरी ग्रामीण ...

The risk of corona increased in rural areas; The second wave killed 122 people | ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल १२२ मृत्यू

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल १२२ मृत्यू

Next

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: शहरी भागात अजूनही कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्या जास्त असली तरी ग्रामीण भागातील संख्याही वेगाने वाढू लागली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील या पावणे चार महिन्याच्या काळात तब्बल १२२ जणांनी जीव गमावला आहे. ग्रामीण भागात सध्या १२ कोविड सेंटरमधून कोरोना बाधितांवर उपचार केले आहेत. ऑक्सिजन, साधे, आयसीयू अशी बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, आजच्या घडीला याची कमतरता कुठेही नाही.

पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असलेल्या या दुसऱ्या लाटेत पहिल्या दोन महिन्यातच जिल्ह्यातील सर्व प्रमुख गावांना काेरोनाने कवेत घेतले आहे, याउलट ग्रामीण भागातील फारशी शहरी सोई-सुविधा नसलेल्या; पण निसर्गाने नटलेल्या वाड्या वस्त्या मात्र अजूनही कोरोनापासून लांब आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या लाटेत १ जानेवारीपर्यंत २३ हजार २२३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ८४० जणांना एप्रिल ते डिसेंबर आठ महिन्यात कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला होता. ग्रामीण भागात जानेवारीत ३ कोरोना रुग्ण आणि एक मृत्यू अशी नववर्षाला सुरुवात झालेल्या कोरोनाने हळूहळू पाय पसरत फेब्रुवारीमध्ये खऱ्या प्रकोपाला सुरुवात झाली. ३ रुग्णापासून सुरू झालेली ही साथ २२ एप्रिल अखेरपर्यंत तब्बल ३६ हजार ९९८ जणांना लागण करून गेली आहे तर १२२ जणांचा बळीही गेला आहे.

चोकट ०१

अजूनही कोरोनापासून लांब असलेली गावे, वाड्या

गडहिग्लज: तराळेवाडी, हेलेवाडी

शाहूवाडी: पाल, इंजोळी, सावर्डी, येळवडे, मालापुडे, खताळेवाडी, गौलवाडा, घुंगूर, घुंगूरवाडी, नंदगाव, सोनुर्ले

कागल: गलगले, अर्जूनी, नंद्याळ

भूदरगड: गडबिद्री, न्हाव्याचीवाडी, वरपेवाडी, पडखुंबे, मिणचे बुद्रूक, नावरसवाडी, फये, बसुदेवाडा, पुंडीवरे, आप्पाचीवाडी, माेरस्करवाडी, कोल्हेवाडी , सिमलवाडी, कारीवडे, चिवले, भाटीवाडी, चिक्केवाडी, मठगाव, करंबळी, बेगावडे, केळेवाडी, हेलेवाडी, जाकीनपेठ, मुरकुटे.

आजरा: कोरीवडे, सावरवाडी, भावेवाडी, महागोंडवाडी, खानापूर, पेठेवाडी, देऊलवाडी, सातेवाडी, सुळेरान, आंबर्डे.

करवीर: सडोलकरवाडी, शिप्पेकरवाडी, विठ्ठलवाडी, स्वयंभूवाडी, दुर्गूलवाडी, मारुतीचा धनगरवाडा, मठाचा धनगरवाडा, सादळे.

गगनबावडा: पासंबळे, वेसरफ, काडवे, नरवेली, पारगावकरवाडी, सांगशी, कातळी, सुतारवाडी, कोदे बुद्रूक, कोदे खुर्द, खडुळेे, म्हाळुंगे, बालेवाडी, पडवळवाडी, पाटीलवाडी.

चंदगड: आंबेवाडी, इसापूर, कळसदगे, कालीवडे, मिरवेल, जांबरे, कामेवाडी, महालेवाडी, उतसळी, सरोळी कोलीक.

पन्हाळा: कोलीक, चव्हाणवाडी, पिसात्री, कुंभारवाडी, कोदावडे, तांदूळवाडी, आंबर्डे, जेऊर, गोलीवडे.

राधानगरी: दुर्गमानवाड, रामानवाडी, पाटपन्हाळा, हेलेवाडी,बागलवाडी,सावर्डे, खुरडवाडी.

चौकट ०२

ग्रामीणचा ताण शहरावर

ग्रामीण भागात १२ कोविड केंद्राच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. उद्याेगपती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांना आणखी कोविड केंद्रे काढण्याच्या बाबतीत प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. तथापि, ग्रामीण भागात ऑक्सिजन, व्हेंटीलेटरने परिपूर्ण बेडची संख्या मर्यादीत असल्याने बऱ्यापैकी कोरोना रुग्णांवर उपचार सीपीआर व कोल्हापूर शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये होताना दिसत आहेत.

मृत्यूची शंभरी (ग्राफ)

महिना मृत्यू

१ जानेवारी ०१

१फेब्रुवारी ०७

१मार्च ०४

१ एप्रिल १०

२२ एप्रिलपर्यंत १००

चौकट

१५०४ बेड राखीव

ग्रामीण भागातील रुग्णासाठी १२ केंद्रांवर उपचाराची सोय असली तरी जिल्ह्यातील सर्व ९५ केंद्रांवरही ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेताना दिसतात. यात सरकारी व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या केंद्रांवर पुरेसे ऑक्सिजन, साधे, आयसीयू बेड्‌स उपलब्ध आहेत. ऑक्सिजनचे १७७२, ऑक्सिजन शिवायचे १६७६, आयसीयूचे ४३२, असे एकूण ३ हजार ८८० बेडस राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी २३७६ बेडस फुल्ल असून, १५०४ बेडस अजूनही राखीव आहेत.

चौकट

व्हेंटिलेटरसाठी धावाधाव नाही

२९९ व्हेंटिलेटर्सची सोय असून, त्यातील १९९ व्हेंटिलेटर्स बेड फुल्ल आहेत तर अजूनही १०० शिल्लक असल्याने रुग्णांना धावाधाव करण्याची वेळ आलेली नाही.

Web Title: The risk of corona increased in rural areas; The second wave killed 122 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.