नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

By admin | Published: March 1, 2015 11:57 PM2015-03-01T23:57:20+5:302015-03-02T00:02:09+5:30

पाणी उकळून पिण्याचे आवाहन : जयंती नाल्यातून २०० एमलडी सांडपाणी नदीत

The risk of health is increased in the river banks | नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

Next

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाईपलाईनच्या कामामुळे गेल्या आठ दिवसांपासून जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात येत आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हर फ्लो’ होऊन दिवसभर नदीत मिसळला. गेल्या २४ तासांत तब्बल २०० (दशलक्ष लिटर) एमएलडीपेक्षा अधिक सांडपाणी प्रक्रियेविनात नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर साथींच्या आजारांना नदीकाठच्या गावांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने येत्या काळात राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचे जूनपर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे भविष्यात नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

क्लोरिनचे प्रमाण वाढले
मैलामिश्रीत पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज पाण्यात क्लोरिन टाकण्यात येते. पाणी नदीत मिसळू लागल्यापासून क्लोरिनची मात्रा दुप्पट करण्यात आली. क्लोरिनच्या दुष्परिणामामुळे आजारांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे.


दक्षता घ्या
पंचगंगेत मैलामिश्रीत पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: The risk of health is increased in the river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.