अणदूर - धुंदवडे दरम्यानचा रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:36+5:302021-07-26T04:23:36+5:30
कोपार्डे : गगनबावडा तालुक्यातील अणदूर - धुंदवडे दरम्यान असणारा डांबरी रस्ता दहा फूट खचल्यामुळे या दुर्गम भागातील दळवळणाचा एकमेव ...
Next
कोपार्डे : गगनबावडा तालुक्यातील अणदूर - धुंदवडे दरम्यान असणारा डांबरी रस्ता दहा फूट खचल्यामुळे या दुर्गम भागातील दळवळणाचा एकमेव मार्ग बंद झाला आहे. हा रस्ता अणदूर धरणाशेजारीच असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अणदूर ते धुंदवडे दरम्यानचा रस्ता हा अत्यंत दुर्गम भागातून जातो. रस्त्याच्या एका बाजूने खोल दरी आहे. धुंदवडेकडे जाणारा हा रस्ता अणदूर धरणाशेजारुनच जात आहे. धरणाच्या वरच्या बाजूलाच हा रस्ता खचण्याचा प्रकार झाला आहे. रस्ता दहा ते बारा फूट खचला असून, या डांबरी रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत.
फोटो
अणदूर ते धुंदवडे दरम्यान १० ते १५ फूट रस्ता खचला आहे.