कसबा तारळे दुर्गमानवाड दरम्यानचा रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:59+5:302021-08-12T04:27:59+5:30
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली. ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. यामध्ये डोंगरमाथ्याच्या शेतीसह ...
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली. ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. यामध्ये डोंगरमाथ्याच्या शेतीसह रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, दुर्गमानवाड कसबा तारळे या ४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर दुर्गमानवाडपासून १ किलोमीटर अंतरावरील तीव्र वळणावर दोनशे ते अडीचशे फूट लांबीची चर निर्माण होऊन रस्ता खचला आहे. या रस्त्याला लागूनच असणारा संरक्षण कठडाही अनेक ठिकाणी ढासळला आहे. परिणामी या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. याच रस्त्यावरून प्रसिद्ध देवस्थान विठ्ठलाई देवीच्या दर्शनाबरोबरच धामणी खोऱ्यासह तुळशी जलाशयाच्या पश्चिमेला असणाऱ्या भागातील अनेक गावांसह वाड्यावस्त्यांसाठी मुख्य मार्ग असल्याने सतत वर्दळ असते
दुर्गमानवाड - कसबा तारळे दरम्यान खचलेला रस्ता.
छाया / रमेश साबळे