कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची होणार डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:46 AM2018-02-03T00:46:36+5:302018-02-03T00:49:39+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा व गगनबावडा ते तळेरे या मार्गाच्या डागडुजीस लवकरच सुरुवात होणार आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने सात कोटींची निविदा प्रसिद्ध केली असून सहा महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे.
कोल्हापूर ते गगनबावडा हा मार्ग तळकोकणाला जोडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया इतर मार्गापेक्षा जवळचा व सुरक्षित मार्ग म्हणून तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या मार्गांवरील वाहतूक अधिक असते. या मार्गांवरील वाहनांची संख्या पाहता रस्ता अरुंद आहे. रहदारी जास्त असल्याने रस्ता लवकरच खराब होतो. त्यात धुवाधार पाऊस असल्याने दरवर्षी रस्ता उखडला जातो. या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे बांधकाम विभागाकडून राष्टÑीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला आहे. या राष्टÑीय मार्गाचे काम सुरू होण्यास अद्याप वेळ असून तोपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून डागडुजीच्या कामाची निविदा जाहीर केली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गासाठी ४ कोटी ३३ लाख ८८ हजार, तर गगनबावडा ते तळेरे रस्त्यासाठी २ कोटी ५६ लाख ६८ हजारांची निविदा राष्टÑीय महामार्ग विभागाने काढली आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर १६ फेबु्रवारीपर्यंत आॅनलाईन निविदा भरायची असून २० फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहे. खड्डे भरण्यासह डांबरीकरणाचे काम यातून केले जाणार आहे.
हस्तांतरणाचे भिजत घोंगडे!
कोल्हापूर ते गगनबावडा मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे; पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्टÑीय महामार्ग विभागाकडे अद्याप हस्तांतरित झालेला नाही. या रस्त्याचा विकास आराखडा राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार ठेवला आहे.
दुसºयांदा निविदा
या मार्गाच्या डागडुजीसाठी राष्टÑीय महामार्ग विभागाने यापूर्वीही निविदा काढली होती; पण दोन्ही कामांसाठी प्रत्येकी एकच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात आली आहे.