मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:54 PM2020-09-25T12:54:20+5:302020-09-25T12:55:16+5:30

मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करणेत आले. या वेळी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहिर केले.

Road to peace in Kodoli for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको

कोडोली ता. पन्हाळा येथील एमएसईबी फाटा येथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन केले.

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको एमएसईबी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

कोडोली -मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहिर केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा विविध घोषणानी परिसर दुमदुमला. संतोष जाधव, सुरेश पाटील यानी या रास्ता रोको संदर्भात व्यापक भूमिका स्पष्ट करीत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यन्त शांततेच्या मार्गाने व कायदा व सुव्यवस्था राखत आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगीतले. या प्रसंगी गौतम कांबळे, जयदीप पाटील, संतोष जाधव, सुरेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी निर्माण सामाजिक संस्थेचे जयदीप पाटील यानी मराठा समाजाला आरक्षणातून हक्क मिळावेत यासाठी सर्वानी एकत्र येवून काम करण्याचे आवाहन केले. आंदोलन स्थळी सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 

Web Title: Road to peace in Kodoli for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.