महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या ‘वाटेवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:05 AM2017-08-12T00:05:27+5:302017-08-12T00:05:31+5:30
संतोष बामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे कुरण शेतीकडील शेतकºयांचे डोळे महामार्गाच्या कामाकडे लागले आहेत.
कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये बायपास मार्गावर उदगाव येथील टोल नाक्याजवळून महामार्गाच्या कामात या ओढ्यावर नवीन सर्व्हेनुसार पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे कुरण रस्ता तब्बल १५ फूट खोल जागेत गेला आहे. यावर शेतकºयांनी आंदोलन केल्यावर सुप्रीम कंपनीच्या अधिकाºयांनी महामार्ग ते आडवा जोड रस्त्यापर्यंत ४०० फूट अंतरावर भराव टाकून नवीन रस्ता करून देणार असल्याचे सांगितले होते. यावर या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर टोलचे भूत आल्यावर, तसेच सुप्रीमच्या कामावरून व नागरिकांच्या मागणीनुसार सरकारने सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. तमदलगे ते उदगाव टोल नाक्यापर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे शेतीच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या कुरण रस्त्यालगत अर्धवट बांधकाम झालेल्या पुलामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर टोलनाक्यावरून सरळ कुरण मार्गाकडे येताना दोन्ही मार्ग अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाजवळ येतात. अरुंद रस्त्यामुळे या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत.
कुरण शेत परिसरातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्व बाजूने शेतकºयांनाच त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बायपास मार्ग अपूर्णच ठेवा; पण आमचा रस्ता आम्हाला सुरळीत द्या, अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.