शिरोळ मार्गावर झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर, वाहतूक, वीज पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:15 PM2019-06-01T19:15:12+5:302019-06-01T19:17:36+5:30
अर्जुनवाड ते शिरोळ मार्गावर यादव पुलानजीक चिंचवाड फाटाजवळ शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळाचे मोठे झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर पडले. वाहतूक, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यूत तारेवर झाड पडल्याने वीज पुरवठा बंद पडला. दुपारच्या वेळी या मार्गावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अर्जुनवाड/कोल्हापूर : अर्जुनवाड ते शिरोळ मार्गावर यादव पुलानजीक चिंचवाड फाटाजवळ शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळाचे मोठे झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर पडले. वाहतूक, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यूत तारेवर झाड पडल्याने वीज पुरवठा बंद पडला. दुपारच्या वेळी या मार्गावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिरज ते अर्जुनवाड मार्गावर पिंपळाचे जुने झाड मूळचा आधार सुटून शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास अर्जुनवाड येथे चिंचवाड फाटा जवळ पडले, ते विद्युत तारेवर पडल्याने दुपारपासून वीज पुरवठा बंद पडला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
मिरज ते अर्जुनवाड मार्गावर कुरुंदवाडकडे जाणारी वाहने अर्जुनवाड गावातुन तर मोठी वाहने घालवाड मार्गे सोडण्याची व्यवस्था केली. यासाठी ग्रामपंचायतकडील सेवकाची नेमणूक केली. सार्वजनिक बांधकाम खाते, एसटी सेवा आदीना सूचना देऊन सरपंच मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.