महिनाभरापूर्वी केलेला रस्ता उकरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:40+5:302021-06-21T04:17:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : एस टी स्टॅण्ड ते पालिका चौका दरम्यान नव्याने केलेला रस्ता विद्युत पोलचे भूमिगत वायरिंगसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : एस टी स्टॅण्ड ते पालिका चौका दरम्यान नव्याने केलेला रस्ता विद्युत पोलचे भूमिगत वायरिंगसाठी ठेकेदाराने उकरला. सार्वजनिक बांधकाम खात्याने दर्जेदार केलेल्या रस्ता पालिकेच्या ठिसाळ नियोजनामुळे महिन्यात उकरण्याची नामुष्की पालिकेवर आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एस.टी. स्टॅण्ड ते पालिका चौकापर्यंतचा राज्य मार्ग दुर्लक्षित होता. या रस्त्यावर अवजड रहदारी मोठ्या प्रमाणात असते. पालिकेने पालिका हद्दीत दोन ठिकाणी चर मारली आहे. ही चर बुजवूनही मोठी होत असल्याने अपघातास निमंत्रण मिळत असते. याच रस्त्यावर पुढे एस टी स्टॅण्डकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. नागरिकांनी पाठपुरावा करून मे महिन्यात या रस्त्याचे हाॅटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते. या कामाचे डांबर वाळण्यापूर्वीच हा रस्ता भूमिगत वायरिंग टाकण्यासाठी उकरण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालिकेने विद्युत पोल बसविण्यासाठी सिमेंटचे पोल बसविण्याचे फाउंडेशन बसविले होते.या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची आवश्यकता होती.मात्र पालिकेच्या उदासीन व नियोजनशून्य कारभाराचा फटका या रस्त्याला बसल्याचे दिसून आले आहे. रस्ता बेजबाबदारपणे उकरून पालिकेने नुकसान केले आहे. दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसान भरपाई करावी अशी मागणी होत आहे.
00000
फोटो कॅप्शन
पेठवडगाव: येथील पालिका चौक ते एस टी स्टॅण्ड हा रस्ता भूमिगत वायरिंगसाठी असा उकरण्यात आला आहे.(छाया- सुहास जाधव)