शहरातील रस्ते, फुटपाथ बनले चकाचक: कोल्हापूर महापालिकेची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:39 AM2018-09-07T00:39:17+5:302018-09-07T00:41:00+5:30

पावसाळ्यामुळे मुख्य रस्त्यावरील फुटपाथ-बाजूपट्ट्यात वाढलेले गवत, झाडे-झुडपे काढण्याबरोबरच खरमाती तसेच साचलेला गाळ काढण्यात आल्याने, शहरातील बहुतांशी रस्ते गुरुवारी स्वच्छ झाले. महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्यावतीने एकाच

 Roads in the city, pavement became pavement: Special campaign for Kolhapur Municipal Corporation | शहरातील रस्ते, फुटपाथ बनले चकाचक: कोल्हापूर महापालिकेची विशेष मोहीम

शहरातील रस्ते, फुटपाथ बनले चकाचक: कोल्हापूर महापालिकेची विशेष मोहीम

Next
ठळक मुद्देआयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग; कर्मचाºयांना दिल्या सूचना

कोल्हापूर : पावसाळ्यामुळे मुख्य रस्त्यावरील फुटपाथ-बाजूपट्ट्यात वाढलेले गवत, झाडे-झुडपे काढण्याबरोबरच खरमाती तसेच साचलेला गाळ काढण्यात आल्याने, शहरातील बहुतांशी रस्ते गुरुवारी स्वच्छ झाले. महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्यावतीने एकाच वेळी सर्व यंत्रणा याच कामात गुंतवली. स्वत: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या मोहिमेत भाग घेतला.

शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूपट्ट्या व फुटपाथवरील अतिक्रमण व अडथळे काढण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू करण्यात आली. ही मोहीम आरोग्य विभाग, सर्व विभागीय कार्यालये, अतिक्रमण विभाग व उद्यान विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

रस्त्यावरील खरमाती काढणे, कचरा हटविणे, गटर-चॅनेल सफाई करणे, फुटपाथजवळील झाडे-झुडपे, तणकट काढणे, झाडांच्या फांद्या छाटने, फुटपाथवरील होर्डिंग, बॅनर, टपºया व शेड हटवून पादचाºयासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू खुल्या करून देण्यात आल्या.
या मोहिमेअंतर्गत गुरुवारी यल्लमा मंदिरचौक ते हॉकी स्टेडियमपासून इंदिरा सागर हॉटेलपर्यंतचा रस्ता, फुलेवाडी ते जावळाचा गणपती, जनता बझार चौक ते टेंबलाई उड्डान पूल पुढे शाहूनाका, सायबर चौक ते राजेंद्रनगर नाका, शिरोली जकात नाका ते ताराराणी चौक व धैर्यप्रसाद हॉल, आदी रस्ते स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्यावतीने या रस्त्यांच्या ठिकाणी साफ-सफाई करून कचरा, ग२टर सफाई, तणकट काढण्यात आले.

मोहिमे दरम्यान यल्लमा चौक ते हॉकी स्टेडियम रोड, उड्डाण पूल ते मिलिटरी मेनगेट, कावळा नाका ते वृषाली आयलँड या ठिकाणी आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित उपशहर अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना डॉ. चौधरी यांनी दिल्या.


स्वच्छतेसाठी राबविली मोठी यंत्रणा
मोहिमेसाठी चार जेसीबी, सहा डंपर, एक आयवा, पवडी विभागाकडील १०० कर्मचारी, उद्यान विभागाकडील ३० कर्मचारी, आरोग्य विभागाकडील २०० कर्मचारी, अतिक्रमण विभागाकडील १० कर्मचाºयांनी ही मोहीम राबविली.
ही मोहीम अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्या नियंत्रणाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, सहा.आयुक्त संजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांनी राबविली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे गुरुवारी शहरातील रस्ते, फुटपाथवरील झाडे-झुडपे काढण्याबरोबरच खरमाती, अतिक्रमण हटविल्यामुळे रस्ते स्वच्छ झाले. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

Web Title:  Roads in the city, pavement became pavement: Special campaign for Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.