CoronaVirus Lockdown : पेन्शन, पगारासाठी रांगा रस्त्यावर : ‘जनधन’च्या पैशासाठी महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:34 PM2020-04-13T16:34:29+5:302020-04-13T16:36:11+5:30
पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती.
कोल्हापूर : पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती.
शुक्रवारी गुडफ्रायडे, दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक अशी सलग तीन दिवस बँकांना सुट्टी होती. दरम्यान, महापालिकेसह शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार जमा झाले.
सुट्टी असल्यामुळे त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे सोमवारी बँकांमध्ये पेन्शन आणि कर्मचाऱ्यांनी जमा झालेला पगार काढण्यासाठी गर्दी केली. काही बँकांसमोरील रस्त्यावर रांगा आल्या होत्या. सोशल डिस्टन्ससाठी पट्टे आखून दिले असून, अंतर ठेवून तसेच सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे.