बुद्धिबळ : पुण्याचा रोहन जोशी ठरला विजेता, अनुज दांडेकर उपविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:53 PM2020-02-10T16:53:55+5:302020-02-10T16:56:15+5:30
कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूर : कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले.
पुण्याचा अनुज दांडेकर आणि जयसिंगपूरची दिव्या पाटील या दोघांचे समान साडेसात गुण झाल्यामुळे सरस टायब्रेक गुण आधारे अनुजला उपविजेतेपद मिळाले. दिव्याला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. तिघांना अनुक्रमे सहा, पाच व चार हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
येथील श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण मराठे यांच्या हस्ते झाले.
यावेळी आनंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर, सागर गुळवणी, दीपक वायचळ, बी. एस. नाईक, अनिल हिवरेकर, विद्यानंद देवधर, स्वाती कुलकर्णी, वैदेही बोरकर, अभिजित कुलकर्णी उपस्थित होते. नागनाथ हलकुडे परिवार, योगेश महामुनी, अनुराधा गुळवणी, जयश्री पाटील, शाहरुख कुरणे, अनिकेत कुलकर्णी, धनंजय इनामदार, अजित कुलकर्णी यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
गटनिहाय विजेते
- खुला गट - श्रीराज भोसले, प्रणव पाटील, रवींद्र निकम, राहुल सामानगडकर, मुदस्सर पटेल, संतोष कांबळे, अथर्व भांबुरे, सारंग पाटील, सौरभ छत्रे, निहाल मुल्ला, अनिष गांधी, सदानंद बाचलकर, श्रीधर तावडे, निहाल महात.
- ६० वर्षांवरील गट- बी. एस. नाईक, भारत पाटोळे, अविनाश चपळगावकर, सूरज पाटील. महिला गट- जिया महात, श्रावणी हलकुडे, श्रावणी बोरकर, समृद्धी कुलकर्णी, सृष्टी कुलकर्णी, श्रावणी खाडे-पाटील, अरिना मोदी, अवनी कुलकर्णी.
- १५ वर्षांखालील गट- आयुष महाजन, रोहित बोडके, सुमित लिमये, आर्यन हलकुडे, प्रणव गुणके, अर्जुन चौगुले, कनिष्क शिर्के, सार्थक घोरपडे.
- १३ वर्षांखालील गट- हदिन महात, हर्ष शेट्टी, विश्वनिल पाटील, नील मंत्री, तनिष्क देसाई, हर्ष वेदांत, आदित्य कोळी, अनिश असनारे.
- ११ वर्षांखालील गट- दिशा पाटील, प्रज्वल वरुडकर, पार्थ शेलार, सोहम जगनाडे, राजेश कुलकर्णी, व्यंकटेश खाडे-पाटील, संकेत चौगुले, आर्यन पाटील.
- नऊ वर्षांखालील गट- अथर्व तावरे, राजदीप पाटील, अभय भोसले, आदित्य चव्हाण, आर्यन मंत्री, आयुष हतगिणे, तनिष्क कवडे, इंद्रनील पाटील.
- ७ वर्षांखालील गट- आशिष मोटे, आरव पाटील, वेदिका यमगर, अर्णव पाटील, प्रेम निचळ, वीर कारंडे, श्लोक आंबेकर, अनुजा कोळी.