रोहित दळवी ‘सुनील श्री’चा मानकरी- : लिंगनूरमध्ये शहीद जवान सुनील जोशिलकर स्मृतिदिनी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:01 AM2019-01-09T01:01:49+5:302019-01-09T01:02:35+5:30

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील ...

Rohit Dalvi 'Sunil's Manchari: - Shaheed Jawan Sunil Joshilkar Memorial Day at Linganoor | रोहित दळवी ‘सुनील श्री’चा मानकरी- : लिंगनूरमध्ये शहीद जवान सुनील जोशिलकर स्मृतिदिनी स्पर्धा

रोहित दळवी ‘सुनील श्री’चा मानकरी- : लिंगनूरमध्ये शहीद जवान सुनील जोशिलकर स्मृतिदिनी स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्दे६० स्पर्धकांचा सहभाग

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील जोशिलकर फौंडेशनतर्फे आयोजित खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नेसरीच्या रोहित दळवी याने ‘सुनील श्री’चा किताब पटकाविला. त्याला रोख ५५५५ व चषक देऊन गौरविण्यात आले. रणजित चौगुले (बेस्ट पोझर, गारगोटी), अमोल ºहाटवळ (बेस्ट डेव्हलपर, बेकनाळ), राजेंद्र जाधव (बेस्ट बायसेफ, करंबळी), रोहित भोगण (बेस्ट थाईज, कोवाड) यांचा सत्कार झाला. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते.

स्पर्धेत गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल व भुदरगड तालुक्यांतील ६० स्पर्धकांनी भाग घेतला. प्रारंभी शहीद जवान सुनील यांच्या प्रतिमेचे पूजन गटविकास अधिकारी सीमा जगताप यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, अनुप पाटील, ऋतुराज रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गटनिहाय विजेते अनुक्रमे असे : ० ते ५५ किलो गट- मुकुंद मुसळे (हणबरवाडी), सचिन शिंगे (पेद्रेवाडी), रोहित निकम (कागल), आेंकार यमगेकर (उत्तूर), शुभम गुरव (गडहिंग्लज).
५५ ते ६० किलो गट - ओंमकार शिंदे (गडहिंग्लज), मयूर कांबळे (गारगोटी), सूरज केणे (गारगोटी), राहुल परीट (गडहिंग्लज), अजित लमतुरे (आजरा).

६० ते ६५ किलो गट - अमोल ºहाटवळ (बेकनाळ), रॉनी लाखे (गडहिंग्लज), जालंदर मोरे (वडरगे), अनिल मोहनगेकर (कुदनूर), सौदागर खटके (करंबळी). ६५ ते ७० किलो - रणजित चौगुले (गारगोटी), विजय सूर्यवंशी (गडहिंग्लज), रोहित भोगण (कोवाड), चेतन चव्हाण (गडहिंग्लज), विशाल येसणे (मडिलगे).
७० किलो गट - रोहित दळवी (नेसरी), राजेंद्र जाधव (करंबळी), कैयूम नदाफ (गडहिंग्लज), अमोल राऊत (मुरगूड), अभिजित सुतार (गडहिंग्लज) यांनी यश मिळविले. प्रा. के.बी. केसरकर, संजय धुरे, झाकीर नदाफ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेसाठी फौंडशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महेश जोशिलकर यांनी स्वागत केले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय जोशिलकर यांनी आभार मानले.यावेळी १०९ टी. ए. बटालियनचे बेस्ट जवान म्हणून निवड झालेले लान्सनायक संदीप कृष्णा कोरे (खमलेहट्टी) यांचा गौरव झाला.

लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. डावीकडून अविनाश जोशिलकर, परशराम जोशिलकर, बाळासाहेब मुल्ला, सुधाकर शिंदे, के. बी. केसरकर, विठ्ठल जाधव, सुरेश धुरे, पप्पू जोशिलकर, रवी जाधव, आदी उपस्थित होते.


लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील जोशिलकर फौंडेशनतर्फे आयोजित खुल्या शरीरसौष्ठव

 

Web Title: Rohit Dalvi 'Sunil's Manchari: - Shaheed Jawan Sunil Joshilkar Memorial Day at Linganoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.