राधा शुगर फराळेचे रोलरपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:03+5:302021-08-14T04:30:03+5:30

ऊस उत्पादक, तोडणी, वाहतूकदार यांच्या ॲडव्हान्सचा दुसरा हप्ता खात्यावर जमा केला आहे. चालू वर्षीच्या हंगामात कारखान्याने चार ...

Roller worship of Radha Sugar Farale | राधा शुगर फराळेचे रोलरपूजन

राधा शुगर फराळेचे रोलरपूजन

googlenewsNext

ऊस उत्पादक, तोडणी, वाहतूकदार यांच्या ॲडव्हान्सचा दुसरा हप्ता खात्यावर जमा केला आहे.

चालू वर्षीच्या हंगामात कारखान्याने चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस साखर कारखान्याला पाठवून उच्चांकी गाळपास सहकार्य करावे, असे आवाहन जनरल मॅनेजर सुशील बळवंतराव पाटील यांनी केले. ते फराळे, ता. राधानगरी येथील रिलायबल शुगर ॲन्ड डिस्टलरी पाॅवर (राधा शुगर) या साखर कारखान्याचे रोलरपूजन कार्यक्रमात बोलत होते. रोलरचे पूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नृपाल पाटील, तुषार गोसावी, गोपी भेलके, क्रांतिसिंह पवार-पाटील, तुषार राणे, जनसंपर्क अधिकारी जयधवल पाटील, चीफ इंजिनिअर के. आर. पाटील, चीफ केमिस्ट गणेश पाटील, शेती अधिकारी राजाराम पाटील, ईडीपी मॅनेजर हर्षल लोहार, लेबर ऑफिसर अश्रू लाड, परचेस ऑफिसर गजानन पाटील, रमेश भोसले, शरद पाटील कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ- फराळे, ता. राधानगरी येथील रिलायबल शुगर ॲन्ड डिस्टलरी पाॅवरचे (राधा शुगर) रोलरपूजन करताना कारखान्याचे जनरल मॅनेजर सुशील पाटील व इतर मान्यवर.

Web Title: Roller worship of Radha Sugar Farale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.