आजऱ्यात रोझरी कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:41+5:302021-05-17T04:23:41+5:30

शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोविड केअर सेंटरचा प्रारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या ...

Rosary Covid Care Center started in Ajmer | आजऱ्यात रोझरी कोविड केअर सेंटर सुरू

आजऱ्यात रोझरी कोविड केअर सेंटर सुरू

Next

शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रोझरी कोविड केअर सेंटरचा प्रारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला. सेंटरमध्ये २५ ऑक्सिजन बेड आहेत. उरलेले २५ ऑक्सिजन बेड करावे लागू नयेत अशी काळजी डॉक्टरांनी रुग्णांची घ्यावी, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले.

सद्य:स्थितीला कोरोना रुग्णामध्ये झालेली प्रचंड वाढ, सरकारवर आरोग्य यंत्रणेवर सेवा पुरविताना येणाऱ्या मर्यादा, ऑक्सिजन बेडसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना करावी लागणारी धावपळ या सर्वांवर पर्याय म्हणून आजरा येथील इंडियन मेडिकल असोसिएशन, महसूल व आरोग्य प्रशासनाच्या संकल्पनेतून शासन व खाजगी डॉक्टरांच्या सहभागातून हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

संबंधित कोविड सेंटर संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक आहे, असे स्वागत व प्रास्ताविकात इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजराचे अध्यक्ष डॉ. दीपक सातोस्कर यांनी सांगितले. आजºयातील कोविड सेंटरला खासदार फंडातून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे आश्वासन मंडलिक यांनी दिले. आजरा कोविड सेंटरचा पॅटर्न चंदगड तालुक्यात राबविणारा असल्याचा मनोदय आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला. आजऱ्याचे रोझरी कोविड सेंटर राज्याला रोल मॉडेल ठरावे, अशी अपेक्षा प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. गौतम नाईक, डॉ. रश्मी राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, सभापती उदय पवार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, फादर फेलिक्स लोबो, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक अभिषेक शिंपी, तहसीलदार विकास आहिर, डॉ. अनिल देशपांडे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, विजय थोरवत, डॉ. अशोक फर्नांडीस, डॉ. देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, डॉ. इंद्रजित देसाई, इंद्रजित देसाई-वेळवट्टीकर, डॉ. दीपक हरमळकर, डॉ. सागर पारपोलकर, डॉ. बी. जी. पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

-------------------------

फोटो ओळी : आजऱ्यातील रोझरी कोविड सेंटरचा प्रारंभ करताना खासदार संजय मंडलिक. शेजारी आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, डॉ. दीपक सातोस्कर व अन्य.

क्रमांक : १६०५२०२१-गड-१०

Web Title: Rosary Covid Care Center started in Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.