रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सचा ‘उत्तरेश्वर थाळीस’ मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:17+5:302021-05-12T04:26:17+5:30
कोल्हापूर : उत्तरेश्वरपेठेतील मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्तरेश्वर थाळी उपक्रमास रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या वतीने ७५ हजार रुपयांची ...
कोल्हापूर : उत्तरेश्वरपेठेतील मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्तरेश्वर थाळी उपक्रमास रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या वतीने ७५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून जमलेली ७५ हजार रुपयांची देणगी ‘मातृभूमी ट्रस्ट’चे अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्याकडे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१७०) संग्राम पाटील, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरचे अध्यक्ष बाबा जांभळे, क्लबचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. सुहास कुलकर्णी, मधुरिमाराजे छत्रपती, जीएसआर वारणा वडगावकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली जाईल, असे संग्राम पाटील यांनी सांगितले. समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. त्याचा प्रत्यय या उपक्रमाच्या यशस्वीतेतून दिसून आला आहे, असे या प्रकल्पाच्या अध्यक्षा सविता पाटील यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या अध्यक्षा प्रिया बासरानी, सेक्रेटरी मनीषा पाटील, खजानीस अंजली साधवानी, प्रकल्प समन्वयक सुषमा धर्माधिकारी उपस्थित होत्या. ‘मातृभूमी ट्रस्ट’चे सदस्य युवराज जाधव यांनी आभार मानले.
फोटो (११०५२०२१-कोल-रोटरी क्लब कोल्हापूर रॉयल्स) : कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी उपक्रमासाठी मातृभूमी चॅॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्याकडे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या वतीने ७५ हजार रुपयांची मदत रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यावेळी शेजारी वारणा वडगावकर, आदी उपस्थित होते.
===Photopath===
110521\11kol_5_11052021_5.jpg
===Caption===
फोटो (११०५२०२१-कोल-रोटरी क्लब कोल्हापूर रॉयल्स) : कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी उपक्रमासाठी मातृभूमी चॅॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र जाधव यांच्याकडे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्यावतीने ७५ हजार रूपयांची मदत रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी शेजारी वारणा वडगांवकर, आदी उपस्थित होते.