रोटरीचे काम दीपस्तंभाप्रमाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:10+5:302021-06-30T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस व आरसीसी इस्ट मॅँचेस्टर, यड्राव यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस व आरसीसी इस्ट मॅँचेस्टर, यड्राव यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या प्रोबस व आरसीसी कॉन्फरन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार आवाडे म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून नवउद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शनपर उपक्रम राबवावा. तसेच शहरात रोटरीच्या माध्यमातून डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावा.
बाळासाहेब देवनाळ यांनी स्वागत व गजानन सुलतानपुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश दत्तवाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास सुरेश जाजू, डॉ. राजेंद्र पोळ, विजयानंद लंबे, विजयकुमार हावळे, आदी उपस्थित होते. मीरा जोशी यांनी आभार मानले.