हाथरस घटनेच्या निषेर्धात आरपीआयचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:45 PM2020-10-08T14:45:32+5:302020-10-08T14:49:21+5:30

उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेर्धात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)तर्फे गुरुवारी दसरा चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधमांना फाशी द्या, आरोपींना पाठीशा घालणाऱ्यांना बडतर्फ करा, आदी घोषणांनी परिसर दणाणला.

RPI's agitation in protest of Hathras incident | हाथरस घटनेच्या निषेर्धात आरपीआयचे आक्रोश आंदोलन

कोल्हापूरातील दसरा चौकात आरपीआय (आठवले गट)तर्फे गुरुवारी हाथरस घटनेच्या निषेर्धात आक्रोश आंदोलन करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देहाथरस घटनेच्या निषेर्धात आरपीआयचे आक्रोश आंदोलनघोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेर्धात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)तर्फे गुरुवारी दसरा चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधमांना फाशी द्या, आरोपींना पाठीशा घालणाऱ्यांना बडतर्फ करा, आदी घोषणांनी परिसर दणाणला.

हाथरस घटनेतील पिडीतेच्या कुटूंबांना न्याय मिळावा. खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी द्यावी. सर्व घटनेची सीबीआय चौकशी करावी. प्रकरण पाठीशी घालणाऱ्या पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. दलितांवर होणारे अत्याचार त्वरीत थांबवावेत.

या सर्व बाबींचा तातडीने केंद्र सरकारने विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व सतीश माळगे यांनी केले.

यावेळी श्रीनिवास कांबळे, जानबा कांबळे, चरणदास कांबळे, किरण नामे, बाबासाहेब कांबळे कुंडलिक कांबळे, प्रविण निगवेकर, नितीन कांबळे, सलमान मौलाणी, भानुदास कांबळे, साताप्पा कांबळे, सचिन आडसुळे आदी उपस्थित होते.
 

Web Title: RPI's agitation in protest of Hathras incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.