फये प्रकल्पाच्या दुरूस्तीकरिता १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:42+5:302021-09-05T04:29:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या फुटीमुळे तालुक्यातील प्रकल्पांच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

Rs 1 crore 90 lakh sanctioned for repair of Faye project | फये प्रकल्पाच्या दुरूस्तीकरिता १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

फये प्रकल्पाच्या दुरूस्तीकरिता १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या फुटीमुळे तालुक्यातील प्रकल्पांच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फये व कोंडोशी लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या गळतीबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी यांच्यासोबत प्रकल्पस्थळावर बैठक आयोजित करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २०१९ व २०२१ मध्ये प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पश्चिम घाटातील डोंगर रांगामध्ये झालेले भूस्खलन, पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे ओढ्यांची वाढलेली पात्रे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचेसुद्धा नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात २१ आणि २३ तारखेला कमी कालावधीत प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला परिणामी तालुक्यातील फये व कोंडोशी पाटबंधारे प्रकल्पांनाही धोका पोहोचू शकतो. फये प्रकल्पाचे काम २००४ मध्ये पूर्ण झाले असून, प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.९३ दशलक्ष घनफूट इतकी आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता ७०० हेक्टर आहे. प्रकल्पाच्या गळतीबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी झाल्याने २०२०/२१ मधून गळती प्रतिबंध उपाययोजनेतून १ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या गळतीचे काम वेळेत होईल.

त्याचबरोबर कोंडोशी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम २००० मध्ये पूर्ण झाले असून, या प्रकल्पाच्या सांडव्याच्या बाजूला दरडी घसरून सांडवा प्रवाहामार्गात माती, दगड-गोटे येतात त्यामुळे प्रकल्पास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्यासोबत येत्या आठवड्याभरात दोन्ही प्रकल्प स्थळावर बैठक आयोजित करून शेतकरी व अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून याबाबत योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे सांगितले.

फोटो : आमदार प्रकाश आबिटकर यांचा लावणे.

Web Title: Rs 1 crore 90 lakh sanctioned for repair of Faye project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.