साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:26 PM2019-02-04T18:26:11+5:302019-02-04T18:28:46+5:30

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

Rs. 1236 crores of farmers are exhausted from sugar factories | साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

Next
ठळक मुद्देसाखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकितरघुनाथ पाटील यांचा आरोप, कोल्हापूर,सांगलीतील कारखाने

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

दोन्ही साखर कारखान्यांनी नेमकी किती रक्कम थकवली आहे याची अधिकृत आकडेवारी सांगत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कायदा मोडणाऱ्या कारखानदारांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

पाटील म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाने २0१३ मध्ये सर्व कारखान्यांना सर्व ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये वेगवेगळा दर देता येणार नाही असा निर्णय दिला असताना आताही आधीच्या शेतकऱ्यांना एक तर नंतरच्या शेतकऱ्यांना एक दर दिला जात आहे.

शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफआरपी द्यावी असा कायदा असताना तो न पाळणाऱ्यांना शिक्षा न देता,त्यांचा गाळप परवाना रदद न करता त्यांनाच पाठीशी घातले जात आहे. केवळ एफआरपी देवून चालणार नाही. तर थकलेल्या रकमेवरील १५ टक्के व्याजही मिळाले पाहिजे असे पाटील म्हणाले.

पत्रकार परिषदेला शिवाजी माने, धनाजी चडमुंगे, पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अजित पाटील, राजू कुरंदाळे, बळवंत कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Rs. 1236 crores of farmers are exhausted from sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.