१५०० रुपये अनुदान : रिक्षाचालकांकरिता स्वतंत्र ऑनलाइन कक्ष सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 PM2021-05-20T16:12:52+5:302021-05-20T16:15:09+5:30
Shiv Sena Traffic Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याकरिता ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन व ऑफलाइन कक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडे केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याकरिता ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन व ऑफलाइन कक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडे केली.
जिल्ह्यातील १५ हजार २८७ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. या रिक्षाचालकांना २ कोटी ३० लाख रुपये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेले प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थिक सहाय मिळणार आहे. हे अर्ज कसे करावेत, याची माहिती रिक्षाचालकांना नाही. त्यामुळे यासाठी ऑनलाइन स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतील त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून त्यात कार्यालयाकडील माहिती भरावी. जेणेकरून एकही रिक्षाचालक या अनुदानापासून वंचित राहणार नाही. याचा सहानभूतीपूर्वक विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने करावा.
यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजू जाधव, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.