विनाअनुदानित महाविद्यालयांच्या फीमध्ये २ हजार रूपये वाढ
By admin | Published: June 13, 2017 03:58 PM2017-06-13T15:58:39+5:302017-06-13T15:58:39+5:30
अकरावी प्रवेशासाठी तयारी सुरू : न्यू कॉलेजमध्ये केंद्र
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. अजूनही अकरावी कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची निश्चिती व्हायची आहे.
येत्या आठ दहा दिवसात शाळांमधून गुणपत्रिका मिळाल्यानंतर या प्रक्रि येला वेग येणार आहे. दरम्यान गेली पाच वर्षे विनाअनुदानित महाविद्यालयांनी कोणतीही फी वाढ न केल्याने यंदा सरासरी २ हजार रूपये फी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी न्यू कॉलेज हे प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र राहणार असून अन्य उपकेंद्रे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कला शाखेला २ हजार, वाणिज्य शाखेला ३ हजार तर शास्त्र शाखेसाठी ५ हजार रूपये फी आकारण्यात येत होती. मात्र गेली ५ वर्षे कोणतीही फी वाढ न केल्याने या फीमध्ये सरासरी २ हजार रूपये वाढवण्याचा निर्णय महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यंदाही नियोजनबध्दरित्या अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असून अकरावीच्या प्रवेशापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभाग घेईल.
मकरंद गोंधळी
शिक्षण उपसंचालक,
कोल्हापूर