पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:23 AM2020-04-27T11:23:09+5:302020-04-27T11:25:21+5:30

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना राजवाडा, क्रशर चौक येथे पोलिसांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.

RSP teachers rushed to the aid of the police | पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनाविरोधी लढ्यात सक्रिय : ४२ शिक्षकांचा सहभागपोलिसांच्या मदतीला धावून आले आर.एस.पी.चे शिक्षक

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा विळखा तोडण्यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. रस्त्यावर उभे राहून लोकांचे प्रबोधन करून गर्दी हटविताना पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. या पोलिसांच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील आर. एस. पी. शिक्षक धावून आले आहेत. कोरोनाविरोधी लढाई फक्त प्रशासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. हीच जबाबदारी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (आर.एस.पी. अ‍ॅँड सी. डी.) संघटनेचे चाळीस शिक्षक पोलिसांसोबत विविध ठिकाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत.

सध्या शाळांना सुट्टी असल्याने आर.एस.पी. शिक्षकांनाही सुट्टी आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून प्रशासनाच्या कार्याला आपला हातभार लागावा, या उद्देशाने सर्वजण कार्यरत आहेत. जिल्हा उपमहासमादेशक अनिल कुंभार यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चाळीस आर. एस. पी. शिक्षकांनी प्रतिसाद देऊन ते पोलिसांच्या मदतीला धावून आले. स्वत: अनिल कुंभार हे शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये, विभागीय समादेशक एस. पी. साळवी हे पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे, त्याचप्रमाणे जिल्हा समादेशक एस. एस. पाटील यांनी कोडोली पोलिसांच्या, तर जिल्हा उपसमादेशक श्रीकांत मोरे हे इस्पुर्ली पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहेत.

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना राजवाडा, क्रशर चौक येथे पोलिसांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.

घरातून डबा
सर्व ४० शिक्षक स्वत:चा डबा घरातून घेऊन पोलीस बांधवांच्या मदतीस विविध ठिकाणी धावून गेले आहेत. स्वत: पूर्ण सुरक्षेची जबाबदारी घेऊन, जे नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतात त्यांचे प्रबोधन करण्यासह, विविध चौक, चेकपोस्ट नाके येथे पोलिसांसोबत वाहनांच्या नोंदी घेणे यासारखी कामे करीत आहेत.

 

कोरोनाविरोधी लढ्यात आम्ही उतरलो आहोत. प्रत्येकजण जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस बांधवांचे काम हलके करण्यासाठी कार्यरत आहोत. जिल्ह्यातील ४२ शिक्षक या उपक्रमात सहभागी आहेत.
- एस. पी. साळवी, विभागीय समादेशक
आर. एस. पी. अ‍ॅँड सीडी

 

आर.एस.पी.
कोरोना विषाणूचा विळखा तोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील आर. एस. पी. शिक्षक धावून आले आहेत.
 

 

Web Title: RSP teachers rushed to the aid of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.